एके दिवशी बादशहा अकबरला एक प्रश्न पडला, की आपल्या राज्यामध्ये किती कावळे आहेत?
तो प्रश्न त्यांनी दरबारातील मंत्र्यांना विचारला. प्रश्न ऐकताच दरबारातील मंत्री क्षणभरासाठी गप्प झाले. कारण, एक तर प्रश्नच विचित्र होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधावे, हेही थोडे विचित्रच होते.
प्रत्येक मंत्री एकमेकांकडे पाहू लागला, विचार करू लागला आणि आता राजा अकबरांना काय उत्तर द्यावे, या प्रश्नात पडला. थोडा वेळ झाला, राजा अकबरांना समजले की यापैकी कोणत्याच मंत्र्यांना या प्रश्नाचे उत्तर माहित नाही.
मग त्यांनी शेवटी आदेश दिला, “बीरबलाला बोलवण्यात यावे.”
त्यांच्या आदेशावरून बीरबल लगेच दरबारात हजर झाले. बीरबलांना सर्व हकिकत समजली आणि त्यांनी राजाला म्हटले, “राजा अकबर,
मला या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे. सांगू का लगेच?”
राजा अकबर चकित झाला आणि तसेच दरबारातील मंडळीही. राजा अकबर म्हणाला, “हो, सांग. कळू दे आम्हाला उत्तर.”
बीरबल म्हणाला, “आपल्या राज्यामध्ये एकूण 99,999 कावळे आहेत.”
सर्वांनी बिरबलाला म्हटले, हे चुकीचं आहे. बिरबल, तू कसे काय एवढे कावळे मोजू शकतोस?
राजा अकबर पण म्हणाला, हे बिरबला, तुम्ही कसे काय असे सांगू शकता की आपल्या राज्यामध्ये एवढेच कावळे आहेत.
बिरबलाने सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि शांतपणे स्मित हास्य करून राजाला म्हटला, राजा अकबर, हो, आपल्या राज्यामध्ये एवढे कावळे आहेत.
अगर तुम्हाला विश्वास नसेल बसेत तर तुम्ही मोजून बघा. बिरबलाने हा प्रश्न राजांना आणि त्यांच्या मंत्र्यांना टाकला.
मग यावर अकबर म्हटला, बर, आम्ही मोजतो, पण ह्यापेक्षा अगर जास्त निघाले तर काय ? मग बिरबल म्हटला, मग शेजारच्या राज्यातील काही कावळे आपल्या नातेवाईकांना भेटायला आले असतील.
दरबारात हशा पिकला, सर्वेजन हसायला लागले.
अकबराने पुन्हा विचारले, “आणि कमी निघाले तर ?”
बिरबल म्हणाला, “मग आपल्या राज्यातील काही कावळे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला बाहेर गेले असतील.” हे ऐकून अकबर आणि सर्व दरबारी जोरात हसू लागले.
बिरबल म्हणाला, “मग आपल्या राज्यातील काही कावळे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला बाहेर गेले असतील.” हे ऐकून अकबर आणि सर्व दरबारी जोरात हसू लागले.
अकबर म्हणाले, “बिरबल, तुझ्या बुद्धीची बरोबरी कोणी करू शकत नाही!”
Conclusion of this Akbar Birbal Story
हुशारी म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहित असणे नव्हे, तर कठीण प्रसंगी योग्य आणि चतुर उत्तर देणे होय !